---Advertisement---

विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला ; हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप सातव यांचा आरोप

Follow Us:
---Advertisement---

हिंगोली : विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका व्यक्तीने हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत जीविताला धोका असल्याची माहिती स्वतः आमदार प्रज्ञा सातव यांनी समाज माध्यमांमधून पोस्ट टाकून दिली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव या काँग्रेस पक्षाच्या हात से हात जोडो अभियानात नियोजित दौऱ्यानिमित्त कळमनुरी तालुक्यातील कसबे धांवडा गावात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, भागवत चव्हाण, उमाकांत शेवाळकर, गणेश लोखंडे, ब्रह्मानंद काळे, बाळू पाटील व इतर उपस्थित होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यांच्याशी हुजत घालत पाठीमागून येवून धक्काबुक्की केल्याचीही चर्चा आहे. त्या गावात पोहोचल्यानंतर आधी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्नही या इसमाने केला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!