---Advertisement---

भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे…; शरद कोळी

By team
On: April 2, 2024 3:57 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील ठाकरे व भाजप गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना यात आता ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट भाजपचे नेते राम कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राम कदम तू तमाशातील नाच्याप्रमाणे आहेस. उद्धव ठाकरेंवर बोलण्याची तुझी लायकी नाही. मनसेतून हाकलून दिल्यानंतर भाजपच्या दारात कुत्र्याप्रमाणे भुंकत पडला आहेस. राम कदम तू हिशोबात रहा, अन्यथा तुझा वेगळ्या पद्धतीने बंदोबस्त केला जाईल, अशी विखारी टीका ठाकरे गटाचे स्टार प्रचारक शरद कोळी यांनी आमदार कदम यांच्यावर केली आहे.

शरद कोळी पुढे बोलताना म्हणाले की, राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेनंतर शरद कोळी आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करायला तुझी औकाद काय आहे? आया बहिणींना उचलून आणण्याची भाषा करणारा माणूस, प्रत्येक आया बहिणींकडे वाईट नजरेने बघणारा खट्टा मीठा चित्रपटातील अन्सारी आहेस अशा शब्दात शरद कोळी यांनी टीका केली आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनीही या वादात उडी घेत उद्धव ठाकरे यांची तुलना शोलेमधील जेलर अभिनेता असरानी यांच्याशी केली. आधे इकडे जा, आधे तिकडे जा असा संवाद असरानी यांनी शोलेमध्ये म्हटला. ठाकरे गटाची सध्या अवस्था तशीच झाली आहे. अर्धा इथे… अर्धा तिकडे… आणि मागे वळून पाहिलं तर कुणीच नाही. त्यांचे नेते संजय राऊत पंतप्रधानांबद्दल कोणते शब्द वापरत आहेत? मोदी यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी आहे असे राम कदम म्हणाले. संपूर्ण जग त्यांना जागतिक नेता म्हणून स्वीकारत आहे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांचे शब्द पहा. जनता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांना या शब्दांची शिक्षा देईल असा इशाराही राम कदम यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!