---Advertisement---

लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्सचा उदघाटन सोहळा संपन्न

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१७ :
अक्कलकोट येथे लायन्स क्लब अक्कलकोट रॉयल्स या नूतन क्लबचे उदघाटन प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते संपन्न झाला. नूतन अध्यक्ष प्रदीप पाटील व संचालक मंडळाचा पद्ग्रहण सोहळा माजी प्रांतपाल डॉ व्यंकटेश यजुर्वेदी यांच्या हस्ते संपन्न झाला. नूतन सदस्यांना सदस्यत्वाची शपथ प्रथम उपप्रांतपाल सुनील सुतार यांनी दिले. यावेळी या क्लबचे मार्गदर्शक द्वितीय उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याच कार्यक्रमात लायन्स क्लब अक्कलकोट या जुन्या क्लबचा डिजी व्हिजिट हा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शिवशरण खुबा हे होते. यावेळी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी संचालक अमोलराजे भोसले, रिजन चेअरमन डॉ अभिजित जोशी, झोन चेअरमन महेश कारंडे, कॅबिनेट सेक्रेटरी राजेंद्र वडगुळे, कॅबिनेट ट्रेझरर सुनील पट्टणशेट्टी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमास शिवानंद नंदर्गी, संतोष जिरोळे, स्वामींनाथ गुरव, शंकर माशाळे, राजेंद्र हत्ते, सुभाष गडसिंग, मल्लिनाथ साखरे, प्रभाकर मजगे, शिरीष पंडित, एम के पाटील, गौरीशंकर चनशेट्टी,बाबासाहेब निंबाळकर, विठ्ठल तेली, मल्लिनाथ मसुती, अभिजित लोकापुरे,आकाश वेदपाठक, अमोल धोंगडे, अनिरुद्ध धोंगडे, चंद्रशेखर अडवितोटे, चंद्रशेखर पाटील, धरेश्वर उन्नद, ईरणा सलगर, जलील पटेल, मल्लिनाथ पाटील, मनोज सक्करगी, मनोज निकम, प्रकाश करकी, प्रतीक मेहता, राघव पोतदार, राहुल गडकरी, रविकिरण हँचाटे, रोहित भुजंगे, रोहित खोबरे, संजीवकुमार हिल्ली, संतोष मशाळे, शरण कापसे, शिवानंद जत्ती, सुनील इसापुरे, स्वामींनाथ दुलंगे, त्रिविक्रम हत्ती, उदय नरेगल, विनायक बुदले, बाबूशा जमादार हे सर्व चार्टर सभासद उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!