---Advertisement---

प्रियकराचा थरार : बनाव रचून केला खून

By team
On: June 27, 2024 10:10 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक मोठ्या शहरात हाणामारी व खुनाच्या घटना नियमित घडत असतांना पालघरमधील विरारमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येपर्यंत गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, धनश्री आंबडस्कर (वय 32 वर्ष) ही महिला रुपेश आंबडस्कर (वय 37 वर्ष ) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता. तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी शेखर कदम हा धनश्रीच्या घरी आला होता. त्यावेळी दोघामध्ये भांडण झालं आणि संशयित आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव रचून तिला जवळचा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!