नागपूर : वृत्तसंस्था
देशातील दिल्ली येथे भाजपला तब्बल २७ वर्षांनी मोठे यश आल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्र पाठोपाठ एक है तो सेफ है…! मुळेच दिल्ली विधानसभेतही मोठा विजय भाजपला मिळाला, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा विकास आणि सुशासनाच्या दिशेने भाजपला मिळालेला कौल असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमुखी विकासावर जनतेने शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. 27 वर्षानंतर दिल्लीत सत्तेची संधी भाजपला मिळाली. दारुण पराभवाला आप सामोरे जाताना एकीकडे मुख्यमंत्री आतिशी विजयी झाल्या. तर दुसरीकडे आपचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक दिग्गज पराभूत झाले. भाजपच्या या अभूतपूर्व, बहुप्रतिक्षित विजयानंतर उपराजधानी नागपुरात शहर भाजप कार्यालय, विभागीय कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. ढोलताशांच्या गजरात महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत, पेढे, लाडू भरवित आनंदोत्सव साजरा केला.