मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी त्यांनी राज्याच्या शाश्वत विकासाचा रुपरेषा हातात घेण्यात आली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे असा मोदींचा संकल्प आहे. त्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल, असे म्हणत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवात केली.
यावेळी अजित पवारांनी राज्याचं नवं औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याच सांगितले आहे. पाच वर्षांच्या कालावधीत ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल. यासोबत आकाश व संरक्षण क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण, सूक्ष-लघू-मध्यम उपक्रम धोरण, चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार आहे. नवे कामगार नियम होणार आहेत. तसेच राज्यात ३७ विशेष आर्थिक क्षेत्रे विकसित केली जाणार असल्याचेही अजित पवारांंनी सांगितले आहे.