---Advertisement---

मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्या : तनिषाचा रक्तस्राव अन् वेदनांनी विव्हळत होती !

By team
On: April 4, 2025 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्या अडकले आहे या रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून रुग्णालय प्रशासन मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पोटात दुखत असताना आणि ब्लीडिंग होत असताना रुग्णालयाने पैसे दिले तरच उपचार होतील अशी भूमिका घेतली. पोटदुखीसाठी साधी गोळी देखील दिली नाही, 10 लाख भरा नाहीतर ससूनमध्ये जा तिथे चांगले उपचार होतात असे म्हटल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे रुग्णालयात घेऊन आलेल्या महिलेवर उपचारासाठी 10 लाख रुपये भरा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यातले अडीच लाख भरतो, असे सांगूनही रुग्णालयाने गर्भवती महिलेला दाखल करून घेतले नाही. परिणामी महिलेला त्रास वाढला. महिलेची प्रसूती झाली, मात्र बाळांना जन्म दिल्यावर तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर मृत तनिषा भिसेच्या नंदेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

तनिषा भिसेच्या नंदेने सांगितला घटनाक्रम म्हणाल्या की, आम्ही सकाळी 9 वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेलो. सुरुवातील बीपी चेक केला त्यावेळी डॉक्टर घैसा यांनी आम्हाला सांगितले की, बीपी जरा हाय झाला आहे, 150-100 झाला आहे. तुम्ही नवीन इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर घेऊन या असे सांगितले. तिथे असेसमेंट रुममध्ये गेलो. तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले काही खाऊ नका, परिस्थिती नाजूक आहे, आपल्याला सिझर करावे लागेल, तुम्ही पाणीही पिऊ नका. तेव्हा रुग्णालयाचा ड्रेस देण्यात आला, यावेळी डॉक्टर घैसा आले आम्ही त्यांची भेट घेतली. तेव्हा चेक करुण त्यांनी आम्हाला सांगितले की परिस्थिती नाजूक आहे, आपल्याला बीपी वाढला आहे, ब्लीडिंग होत आहे, पोटात दुखतंय तर आपल्याला लगेच सिझर करावे लागेल. प्रीमॅच्युअर असल्याने बाळांना एनआयसीयूमध्ये ठेवावे लागेल. त्यांचा खर्च 10 जाख रुपये आहे. दोन्ही बाळांचे मिळून तुम्हाला 20 भरावे लागतील. आता किमान 10 लाख भरा पैसे भरणे होत नसेल तर ससून रुग्णालयात जा तिथेही उपचार चांगले होतात. माझ्या वहिनीसमोर हे सर्व सांगितले आणि निघून गेले.

तनिषा भिसेच्या नंदेने सांगितला घटनाक्रम म्हणाल्या की, आम्ही पैशाचे नियोजन करतो तुम्ही उपचार सुरू करा, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी सांगितले की तुमच्या जुन्या गोळ्या घ्या, आम्ही तसेही केले. माझ्या वहिनीने याच गोष्टीचे टेन्शन घेतले की 20 लाख रुपये कुठून आणणार. त्यांनी पैसे भरले नाही म्हणून काहीच उपचार केले नाही. आम्ही तिथे 3 लाख रुपये घेऊन बसलो होतो, पण त्यांनी ते घेतले नाही. आम्ही केळकर सरांना कॉल केला पण त्यांनी काहीच रिल्पाय दिला नाही. रुग्णाचा ड्रेस देखील आम्ही बदलून घेतला.

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित रुग्णालय प्रशासनाच्याबाबत आरोग्य विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर यांना माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आशिष जयस्वाल यांनीही दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी चौकशी समितीचे गठन केले आहे. दरम्यान, तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्यांना आम्ही दाखल करू शकत नाही. क्रिटिकल शस्रक्रिया आहे, असे सांगितले गेले आणि प्रवेश नाकारला त्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही तिथल्या प्रशासनाने ते झुगारून त्यांना दाखल केले नाही. त्यामुळे त्यांचा अंत झाला आहे. दीनानाथ रुग्णालय हे गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवले जाते, असेही गोरखे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!