---Advertisement---

मनोज जरांगेंच्या सूचनेनुसार सोलापुरात विधानसभेच्या इच्छुकांचा मेळावा

By team
On: October 18, 2024 6:28 PM
Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी रणशिंग फुंकले असून ते राज्यभरात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समोर आले आहे. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी आपला कार्य अहवाल, बायोडाटा, समाजकार्य, सर्वसामान्य वंचित घटकाविषयी केलेले कार्य, आरक्षण आंदोलनातील योगदान, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी आदींची माहिती घेऊन सोलापुरात मेळाव्यासाठी यावे. अकरा विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मीय, सर्वजातीच्या उमेदवारांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!