---Advertisement---

मविआचे ठरले : रविवारी ‘या’ प्रकारे करणार आंदोलन !

By team
On: August 28, 2024 2:21 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडी आता मालवण मधील समुद्र किणारी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चांगलीच आक्रमक झाली असून आम्ही सरकार विरोधात रविवार आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील हुतात्मा स्मारकापासून तर गेट वे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. मालवण मध्ये जे घडले तसे आज पर्यंत महाराष्ट्रात कधीही घडले नव्हते. शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रामध्ये कोसळला आहे. त्यामुळे महाफुटीच्या सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. त्यांचा कारभार किळसवाणा असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र न्यायालयाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील बंदी आणली गेली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच्याही मध्ये मोदी, शहांचे दलाल रस्ता अडवून बसले आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मालवणमधील घटनेवरुन टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला हे कारण देणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस गाठला असल्याचे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे देखील समुद्र किणारी राहत होते. मात्र त्यांची आजपर्यंत वाऱ्याने कधी टोपी उडाली, हे माझ्या ऐकण्यात नसल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही टीका केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!