---Advertisement---

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी अक्कलकोटमध्ये उद्या बैठक

By team
On: July 30, 2024 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधि

येत्या ७ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या शांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू झाली आहे.या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथील सर्जेराव जाधव सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा समन्वयक माऊली पवार,राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे,एड. जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जरांगे पाटील हे शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सोलापुरातून सुरू करणार आहेत. ही रॅली भव्य होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे. या नियोजनाचा भाग म्हणूनच उद्या अखंड सकल मराठा समाजाच्यावतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीमध्ये तालुक्याच्यावतीने शांतता रॅलीचे नियोजन कसे करावे यासाठी तालुक्यातील मराठा समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा व नियोजन केले जाणार आहे.तरी या बैठकीला सर्व मराठा बांधवांनी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!