ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव ; जरांगे पाटलांची टीका

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले आहे, यात मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. तसेच त्यांनी आता राज्यातील सर्व मराठा नेत्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

आम्ही आधी आंदोलनाला बसलो. तिथे आमच्यापुढे दुसरे आंदोलन उभे केले. मराठा समाजचे आंदोलन कोणी भरकटवले? भुजबळ यांचा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. भुजबळ हे राज्यात चिथावणी देत आहेत. या वयात मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. कारण तुम्ही कितीही एकवटले तरी मराठा समाजाची संख्या ही राज्यात 50% आहे हे लक्षात ठेवा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी राज्यातील मराठा नेत्यांनाही आवाहन केले आहे. ते म्हणाले, ”राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे. आपल्या समाजाच्या लेकरांचे वाटोळं होऊ द्यायचे नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडे पाडले आहे. आता तरी त्यांनी मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे”, असे मनोज जरांगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!