मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मस्त्यविकास मंत्री नितेश राणे हे त्यांनी केलेल्या विधानामुळे सतत चर्चेत असतात. तर त्यांची काही विधाने वादग्रस्त स्वरुपाची देखील असतात, अशी चर्चा होत असते. बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी काही विधाने केली आहेत. या विधानांमुळे नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊच्या धक्क्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही, त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आलो असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.
बांगलादेशी Xडे फार वळवळ करत आहेत. हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे. जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही, मी इथून ही धमकी देऊन जात आहे, असे देखील नितेश राणे म्हणाले. तसेच इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळणार नाही, मग तुम्हाला पाकिस्तानातील अब्बांकडे पाठवून देऊन, वळवळ लगेच बंद करावी, असा इशारा त्यांनी दिला.
हिरव्या सापांना मदत करणाऱ्यांची नावं द्या त्यांचे देखील कार्यक्रम करतो. इथे मच्छी विकण्याचा व्यवसाय फक्त हिंदुंनाच करण्याची मुभा आहे. कुठलाही बांगलादेशी रेहिंग्याला परवानगी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या मला इथे दिसला तर मी त्याला आपल्या पायावर मस्जिदीमध्ये जाऊ देणार नाही, अशी थेट धमकीच त्यांनी दिली. ज्याला व्हीडिओ दाखवायचा आहे, त्याला दाखवा. रोहिंग्या नावाची घाण आम्हाला नको आहे, असा थेट इशारा नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला.
अनधिकृत मदरसे मस्जिद इथे ठेवायचे नाही, पुढे काय करायचं ते बघू. तुम्ही एकत्र राहिला तर आजूबाजूला देखील लोकं फिरकणार नाही. हिंदू समाजाचे लोकं आहेत त्यांनाच बसायला द्या. कारवाई करण्याचे अधिकार केंद्र आणि राज्याला असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्या विधानाने नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.