---Advertisement---

पीर ख्वाजा दाऊद यांच्या उरुसास ३१ मे पासून प्रारंभ

By team
On: May 28, 2025 3:44 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शहरातील सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाहच्या उरुसाला येत्या ३१ मे पासून प्रारंभ होत असून १ व २ जून पर्यंत असे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार ३१ मे रोजी रात्री गंध मिरवणूक निघणार असून, रविवार १ जून रोजी दिवे (यात्रा) सोमवार २ जून रोजी जियारत असल्याची माहीती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज न. मुतवल्ली यांनी दिली. उरुस कालावधीत दर्गा परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून उत्सव कालावधीत तिनही दिवस भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी दर्गाप्रमुख हाजी नसरोद्दीन मुतवल्ली, खलीलअहमद मुतवल्ली, सैपन मुजावर, रियाज मुजावर,माजिद गौर, इम्रान मुतवल्ली, मजहर मुजावर,मुनीर मुजावर,रजाक सय्यद, लालडेमशाक कोतवाल, मतीन पटेल, अल्तमश घोळसगावकर, समीर मुजावर आदी परिश्रम घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!