---Advertisement---

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिशन संजीवनी राबविण्यात येणार- आयुक्त पि.शिवशंकर

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर नागरिक रोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील नागरिक हे आजारी पडल्यानंतर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. उपचार घेत असताना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या, औषध हे उपचार सुरु असे पर्यत घेतात.उपचार संपल्यानंतर आपल्या जवळील गोळ्या, औषध हे तसेच पडून राहतात व नंतर ते आपण कचराकुंडीत फेकून देतो. परंतु या सर्व गोळ्या, औषध सामान्य नागरिकांसाठी व गोरगरिबांना होऊ शकतो.

आपण वापरलेले गोळ्या, औषधे, सिरप यांची योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी मिशन संजीवनी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांना आव्हान आहे की आपण न वापरत असलेल्या गोळ्या, औषध ,सिरप हे तुमच्या उपयोगात येत नसतील आणि एक्सपायरी तारीख संपलेली नसेल. अशा औषध मिशन संजीवनी म्हणून आमच्या सर्व नागरिक आरोग्य केंद्रावर एक पोस्ट ऑफिस सारखा एक डबा ठेवण्यात आला आहे. त्याच्यामध्ये नागरिकांनी आपल्याकडील औषधे जमा कराव्यात ही सर्व औषधे दर आठवड्याला आरोग्याधिकारी व त्याठिकाणीचे फार्मासिस्ट यांच्या माध्यमातून ते वेगळे करण्यात येईल. तसेच त्यातील जे औषध चांगले आहेत. ते सामान्य नागरिकांसाठी वापरण्यात येईल.आणि जे खराब औषध आहेत ते टाकून देण्यात येईल.

तरी उद्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर एकाच वेळी त्या भागातील नगरसेवक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात उद्या सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रसूती ग्रह (डफरीन हॉस्पिटल) येथे सकाळी 10:30 वाजता महापौर श्रीकांचना यन्नम व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

तरी सर्व नागरिकांनी या मिशन संजीवनी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!