---Advertisement---

विठ्ठलाच्या दर्शनासाठी  आमदारांसह कार्यकर्त्यांन हवे व्हीआयपी दर्शन !

By team
On: June 29, 2025 9:15 AM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : वृत्तसंस्था

राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्यात आली असताना, काही राजकीय नेते मात्र या नियमाला बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या 21 कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन मिळावे, यासाठी पंढरपूर देवस्थान समितीला पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात सातही मानाच्या पालख्या आणि हजारो भाविक दाखल होत आहेत. यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असून, दर्शनाची रांग गोपाळपूरच्या बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेलेली आहे. शुक्रवारी देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाले. 24 तास दर्शन सुरू असल्यामुळे हजारो भक्त रात्री-दिवस विठ्ठलाच्या दर्शनासाठी थांबले आहेत. दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत.

आमदार संतोष बांगर यांनी थेट पंढरपूर देवस्थान समितीला २१ जणांच्या नावाची यादी देत, त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची विक्रमी गर्दी झाली असताना, राजकीय नेत्यांचा आपल्या कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धक्कादायक ठरला आहे.

दरम्यान, एकीकडे सामान्य भाविक तासन् तास रांगेत उभे असताना, दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्यांना दर्शन मिळावे म्हणून आमदारच प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे सामान्य वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!