---Advertisement---

विधानसभेत पंतप्रधान मोदींनी जास्त सभा घ्यावा ; शरद पवारांची टीका

By team
On: June 15, 2024 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक उत्साहात झाली. नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळवण्याचा आमचा मार्ग आणखी सुकर होईल, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीला जास्त मतदान झाले असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र 18 सभा झाल्या तसेच एक रोड शो झाला. ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या आणि रोड शो झाला, त्या – त्या जागेवर जनतेने महाविकास आघाडीला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होतील तेवढे जास्त आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद देणे आमचे कर्तव्य असल्याचे शरद पवार यांना म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेचे आभार व्यक्त केले. तर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!