ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोदींचा करिष्मा संपला नाही, तर राऊत महान नेते ; मंत्री पाटलांनी लगावला टोला

मुंबई : वृत्तसंस्था

 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपला मोठे यश आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक नेते आप आपल्या प्रतिक्रिया देत आहे तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सामान्य माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास वाढला असल्याचे दिल्ली विधानसभा निकालावरून स्पष्ट झाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत थोडी गडबड झाली, मात्र, लोकांना खोटा नॅरेटिव्ह पसरवले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विधानसभेत ही चूक दुरुस्त केली. हरियाणा, महाराष्ट्र व दिल्लीतही यश मिळाले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा संपला नाही, संपणार नाही, तर संजय राऊत महान नेते आहेत, ते आप आणि काँग्रेसमध्ये समझोता करु शकले असते, असा टोला पाटील यांनी राऊतांना लगावला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. देशाची राजधानी दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने मिळवलेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास वाढल्याचे उदाहरण आहे. भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यास लोकांचा आणि राज्याचा विकास होणार आहे. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान मोदींचा करिष्मा संपल्याचे विरोधकांना वाटले. मात्र, मोदींचा करिष्मा संपला नाही. संपणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला. मात्र, त्यानंतर लोकांना कळले की, गडबड झाली. विधानसभेला त्यांनी करेक्ट केले. यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणात एकतर्फी यश मिळाले आहे. दिल्लीमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. दिल्ली विधानसभेत सरकार येत आहे. चांगल्या मार्जिनने सरकार येत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दिल्लीत काँग्रेस-आप एकत्र लढले असते, तर निकाल वेगळा असता, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरही चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. काँग्रेस-आपला एकत्र यायला कुणी अडवले होते का? असा सवाल करत संजय राऊत महान नेते आहेत, ते या दोघांमधील समझोता करु शकले असते, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसला सपोर्ट न करता ठाकरे गटाने आम आदमी पक्षाला सपोर्ट केला, येथेच मोठी ठिणगी पडली. आता त्या आघाडीतून इतरांनी बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसच बाहेर पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!