अक्कलकोट : प्रतिनिधी
मराठा मंदिर मुंबई संचलित श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशालेच्या वतीने हिरकणी महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अलकताई जन्मेजयराजे भोसले यांना राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठा मंदिर – विद्यावर्धिनीचे अध्यक्ष योगेश पवार, सचिव मनोहर साळवी, सदस्य सुदाम पाटील, सदस्य सौ. निवेदिता देशमुख, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, हिरकणी महिला संस्थेच्या सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव ए.एम.घाटगे, विश्वस्त महेश गोगी, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक शरद जंगाले, शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापक एस.एन.शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना जाधव, जॉईंट सेक्रेटरी ममता जाधव, जनरल सेक्रेटरी गायत्री सुतार, व मनोज निकम, अरविंद शिंदे, शितल फुटाणे यांच्यासह आदीजण बहुसंख्येने उपस्थित होते. सदरचा सन्मान प्रसालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात करण्यात आला. सदर पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत होत आहे.