मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक व्यक्ती एकदा तरी महामार्गावरून प्रवास करीत असतो आता त्याच लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून फास्टॅगशी संबंधित नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने फास्टॅगसंदर्भात आजपासून (17 फेब्रुवारी) नवीन नियम लागू केले आहेत.
अनेकदा वाहनचालक फास्टॅग खात्यामध्ये पैसे नसतानाही टोल नाका पार करतात. मात्र, आता असे केल्यास चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. समजा, फास्टॅग ब्लॅकलिस्ट अथवा बंद असेल तर टोल नाका पार करण्याच्या 60 मिनिटं आधी रिचार्ज करावे लागेल. चालक टोल पार केल्यानंतरही 10 मिनिटात रिचार्ज करू शकतात. मात्र, या 70 मिनिटांच्या कालावधीत रिचार्ज न केल्यास चालकांकडून दुप्पट टोल घेतला जाईल.
टोल संकलन अधिक सोपे व्हावे व टोल नाक्यावरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
जर फास्टॅग स्कॅन होण्याच्या एक तास आधी किंवा स्कॅन झाल्यानंतर 10 मिनिटांनंतरही खाते निष्क्रिय असल्यास टोल कपात होणार नाही. अशावेळी फास्टॅग खात्यात रक्कम नसली तरीही टोल नाका पार करता येईल. परंतु, फास्टॅगच्या सुरक्षितता रकमेतून दुप्पट शुल्क कापले जाईल. पुढच्या वेळी फास्टॅग रिचार्ज केल्यावर ही रक्कम त्यात जोडली जाईल. तुम्ही https://www.npci.org.in/ या वेबसाइटवर जाऊन फास्टॅगची स्थिती जाणून घेऊ शकता. खात्यात कमी रक्कम असल्यास, केवायसीची मुदत संपल्यास व वाहनाशी संबंधित कायदेशीर वाद असल्यास फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ शकतो. ब्लॅकलिस्टमध्ये असलेले फास्टॅग टोल नाक्यावर वापरता येणार नाही.