ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : पोलिसांच्या दाव्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा करण्यात आला आहे. यामुळे या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराड भोवतीचा कारवाईचा फास आणखीनच आवळला गेला आहे. खंडणी, अ‍ॅट्रोसिटी, हत्या प्रकरणाचे एकत्रित गुन्हे आहेत. पाच साक्षीदारांच्या गोपनीय जबाबानंतर वाल्मीक कराडविरुद्ध पुरावे मिळालेत. संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीकडे आहेत. विष्णू चाटे दोन नंबरचा आरोपी आहे.

वाल्मीक कराडवर आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्या आरोप आहे. या खंडणीला विरोध केल्यामुळे त्याने आपल्या सहकाऱ्याच्या माध्यमातून संतोष देशमुख यांची हत्या केली, असे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

सहा तारखेला संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांच्यात आवादा कंपनीच्या प्रांगणात वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. यानंतर 7 तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडला फोन केला होता. त्यावेळी कराडने सुदर्शन घुलेला सांगितले की, जो आपल्या आड येईल त्याला सोडायचे नाही. यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीत फोन करून धमकी दिली होती.

अवादा कंपनीला 29 नोव्हेंबर रोजी सुदर्शनच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती. तसेच, 6 डिसेंबरला देशमुख, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्यात वाद झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे.

29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मीकने आवादा कंपनीला 2 ‎कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईल वरुन ‎मागितली होती. त्याच्या वसूलीची जबाबदारी ‎चाटेसह सुदर्शन घुले व सहकाऱ्यांकडे दिली‎ होती. यातूनच 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन ‎घुले हा सहकाऱ्यांसह मस्साजोगला ‎कंपनीच्या कार्यालयात गेला. तिथे सुरक्षा‎ रक्षकाला मारहाण केली. सुरक्षा रक्षकाने‎ बोलावल्याने सरपंच संतोष देशमुख तिथे ‎गेले. त्यांच्यात व घुलेमध्ये वाद झाला. या‎ प्रकरणात घुले विरोधात गुन्हा नोंद करण्यात‎ आला. या रागातून घुले याने 9 डिसेंबरला ‎अपहरण करुन देशमुख यांची हत्या केली.‎अशी मांडणी सीआयडीने केली आहे.‎

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू‎ चाटे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, महेश‎ केदार, सिद्धार्थ सोनवणे व जयराम चाटे हे‎ आरोपी अटक आहेत. त्यांच्या विरोधात ‎दोषारोपपत्र दाखल आहे. तर, कृष्णा‎ आंधळे हा अद्यापही फरार आहे.‎ बीड शहरात कराडची दहशत असल्याचेही सीआयडीने आरोपपत्रात नमूद केले आहे. या हत्येच्या तपासात पाच साक्षीदारांनी महत्त्वपूर्ण जबाब नोंदवले असून, त्यामध्ये वाल्मिक कराड विरुद्ध ठोस पुरावे समोर आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!