---Advertisement---

दक्षिण सोलापूर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निलकंठ माशाळे ह्यांची सर्वानुमते निवड

By team
On: September 6, 2025 9:13 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा संघटनेच्या अंतर्गत असलेल्या दक्षिण तालुका पदाधिकारी निवडी प्रसंगी प्रथमता सभेचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर ह्यांची एकमताने निवड करून सभेला सुरुवात करण्यात आले.सभेच्या ठरावात दुकानदारांना दैनंदिन रेशन प्रणालीत येणाऱ्या अडचणी बाबतीत जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर व जिल्हा पदाधिकारी ह्यांच्या समोर मांडण्यात आले.

मांडलेल्या अडचणीवर मार्गदर्शन करताना जिल्हा संघटना ही आज कालची नसून स्वातंत्र्य काळापासून आहे. संबंधित तहसील कार्यालय,जिल्हा पुरवठा कार्यालय व मंत्रालय अश्या वरिष्ठ स्तरावर दुकानदाराच्या अडचणी निवेदनातून वेळोवेळी मांडत आहोत आणि राहू, तसेच संघटनेचे आजपर्यंतचे सर्वच प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याचे कळविले,तसेच भविष्यात दुकानदारांना कोणतेही अडचणी आल्यास जिल्हा संघटनेशी संपर्क साधावे असे सभेचे अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर ह्यांनी उपस्थित दुकानदारांना आव्हानात्मक कळविले. तदनंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार आकस्मित निधन पावल्यास संघटनेच्या वतीने त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत म्हणून पाच हजाराची मदत तात्काळ करावी असे सभेत उपस्थित असलेले शाम तेली ह्यांनी सूचक तर विश्वजीत मेरू ह्यांनी अनुमोदन दिले.

सदर ठरवाचे सर्वानी स्वागत करत सर्वानुमते मंजुरी दिले.सभेच्या अंति दक्षिण सोलापूर संघटनेच्या नूतन तालुकाध्यक्ष पदी निलकंठ माशाळे ह्यांची सूचक सूर्यकांत यारगळे तर आर एस घोडके ह्यांनी अनुमोदन देत तालुका उपाध्यक्ष पदी सुरेश तेली, सचिव सौ. स्वाती बगले, खजिनदार संगम पाटील, सहसचिव सौ. विजयालक्ष्मी विधाते, पुढील सर्व सदस्य संतोष धायगुडे,दामू राठोड, भीमराव बनसोडे,विश्वजीत मेरू, सौ. आर बी बावी,चन्नवीर हिरेमठ तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नागनाथ विधाते व शिवय्या स्वामी यांची एकमताने निवड करून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ह्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख, पंच कमिटी सदस्य बापू गंदगे, जिल्हा सदस्य राजशेखर जवळे व अ झोन अध्यक्ष अभिजित सडडो सह दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!