ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरणामुळे लोकसेवेतून स्वामीसेवेचे समाधान ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

अक्कलकोट, दि.२५ : विदर्भ व नागपुरात
अनेक निस्सीम स्वामीभक्त आहेत.सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे कुटुंबीयही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री पदाची धुरा वाहताना रस्त्यांच्या माध्यमातून सर्व देश जोडण्याचे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेले आहे. त्या माध्यमातून सोलापूर ते अक्कलकोट या चौपदरी करणाच्या रस्त्याचे काम हाती घेऊन अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करून स्वामी दर्शनाकरिता अक्कलकोटी येणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवासाची सोय या चौपदरीकरणामुळे उपलब्ध झाल्याने लोकसेवेतून स्वामी सेवेचे मानसिक समाधान लाभल्याचे प्रतिपादन देशाचे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.सोमवारी, त्यांनी अक्कलकोटला येवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.यावेळी ते बोलत होते. मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सपत्नीक गडकरी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला.  याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील कै. कल्याणराव इंगळे दर्शन व सभामंडपाचे उद्घाटन देखील गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.पुढे बोलताना गडकरी यांनी मी राज्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री असताना माझ्या आई एकदा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाकरिता आल्या होत्या. त्या काळात प्रवासादरम्यान सोलापूर-अक्कलकोट – गाणगापूरचा रस्ता अत्यंत खराब असल्याने अक्कलकोटचा रस्ता चौपदरीकरण व नीटनेटका व्हावा अशी त्यांची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी माझ्या समोर व्यक्त केला होता,
त्यामुळे सोलापूर-अक्कलकोट या चौपदरीकरण रस्त्यामुळे आईंचे स्वप्नही पुर्ण झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.यापुढेही माझ्याकडून विविध माध्यमातून स्वामी सेवा घडत राहो अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक महेश हिंडोळे, मंदिर समितीचे मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, शिवशरण अचलेर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!