---Advertisement---

नो डीजे, नो डॉल्बी-पर्यावरणपूरक आणि शांततेचा सण साजरा करूया ; अक्कलकोटमध्ये पोलिसांची मोठी तयारी!

By team
On: August 25, 2025 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीमध्ये येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन महत्वाचे सण साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पडावेत, तसेच कोणत्याही प्रकारचा जातीय वा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी दिनांक २५ ऑगस्ट २०२८ रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय, कमलाराजे चौक, अक्कलकोट येथे शांतता कमिटीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस अक्कलकोटचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल व वीज विभागाचे अधिकारी, नगरपालिका प्रतिनिधी, गणेश मंडळ पदाधिकारी, डीजे-डॉल्बी धारक, पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीस मा. आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी, मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विलास यामावर, तहसीलदार श्री. विनायक मगर, उप अभियंता (एमएसईबी) श्री. राजू आडम, नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक श्री. शैलेश जाधव, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक श्री. सुरेश चिल्लावार, पोलीस निरीक्षक श्री. नामदेव शिंदे, सपोनि अनिल सणगले, सपोनि निलेश बागाव, तसेच शांतता कमिटी सदस्य श्री. दिलीप सिद्धे, अमोलराजे भोसले, अविनाश मडीखांबे, चंद्रशेखर मडीखांबे, सुनील खवळे, नन्नू कोरबू, बाबा पाटील, संजय देशमुख, मल्लिनाथ पाटील, इरफान दावांना, मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, रत्नाकर गायकवाड, सद्दाम शेरीकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पुढील निर्णय व सूचना दिल्या: गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे करावेत. जातीय तेढ किंवा कोणताही धार्मिक वाद होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि डॉल्बीचा वापर पूर्णतः बंद असावा. “नो डीजे, नो डॉल्बी” ही संकल्पना राबवण्यात यावी. त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट करावी. पोलिसांनी व मंडळांनी परस्पर सहकार्य करून कार्यक्रम पार पाडावा. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. या बैठकीदरम्यान, आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी अन्नदान करणारे श्री. अमोलराजे भोसले यांचा सन्मान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

बैठकीत पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी श्री. विलास यामावर, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, तसेच मा. आमदार श्री. सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी आपली मते मांडली. त्यांनी शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात सण साजरे करण्याचे आवाहन केले आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले. सदर बैठक अत्यंत सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सर्वांनी शांततेचा, सहकार्याचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देत यंदाचे सण अधिक अनुशासित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!