---Advertisement---

बोगस पोलीस नव्हे तर तोतया जिल्हाधिकारी : पोलिसांनी अशी केली अटक !

By team
On: March 26, 2025 9:36 AM
Follow Us:
---Advertisement---

मालेगाव : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून राज्यात बोगस पोलिसांचा सुळसुळाट वाढलाय त्यातच आता बोगस जिल्हाधिकारी बनून नागरिकांना गंडा घालणारी घटना मालेगावात उघड झालीय.  नाशिकच्या मालेगावमध्ये नोकरी तसेच सरकारी जागेवर घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे मुस्लिम नाव धारण करून तो मालेगावमध्ये मागील काही दिवसांपासून वास्तव करीत होता. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंकल नरेश रजक उर्फ अब्दुल रहेमान असे अटक करण्यात आलेल्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. रिंकल हा मालेगावमध्ये मागील काही दिवसांपासून वास्तव्यास होता. येथील नागरिकांशी संपर्क वाढवत त्याने आपली नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. तसेच नाशिक विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याची बतावणी केली. वरचा अधिकारी असल्याचे सांगितल्याने त्याच्या सांगण्यावर नागरिकांनी विश्वास ठेवला.

विश्वास संपादन करत रिंकल याने मालेगावच्या जाफर नगर भागात सरकारी जागा ९९ वर्षाच्या करारावर घेऊन त्या ठिकाणी वसाहत बांधण्यात येत आहे. याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या वसाहतमध्ये घरकुल नावावर करण्यासाठी तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष त्याने दाखविले. यासाठी त्याने अनेकांकडून पैशांची मागणी करत लाखो रुपयांना गंडा घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान रिंकल याने दिलेला शब्द पूर्ण होत नसल्याने त्याच्यावर संशय आला. यामुळे काहींनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. याचा तपास करत पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून लाखो रुपयांची रोकड व महागडी कार हस्तगत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!