---Advertisement---

अक्कलकोटमध्ये आता आणखी एका दंत रोग तज्ज्ञांची भर; सोलापूरला जाण्याची गरजच नाही !

By team
On: May 12, 2025 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट येथे डाॅ. निखिल येणगुरे,MDS.(Root Canal Specialist) यांच्या ए-वन चौक, अक्कलकोट येथील स्पेशालिटी डेंटल क्लिनिक चे उदघाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमुळे अत्याधुनिक उपचार अक्कलकोट शहरातच उपलब्ध झाले असून त्यासाठी सोलापूरला जाण्याची आवश्यकता भासणार नाही,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काढले. पूर्वी दातांच्या काही गोष्टीसाठी वारंवार क्लिनिकला यावे लागत होते. आमच्या क्लिनिकमध्ये मात्र एकाच वेळी या सर्व गोष्टी केल्या जातात.

सर्व गोष्टी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त राहणार आहेत.रुग्णांची वैयक्तिक काळजी आम्ही यामार्फत घेणार आहोत. पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता हे सर्व ट्रीटमेंट केली जाणार आहे, असे डॉ.येणेगुरे यांनी सांगितले. पूर्वी काही गोष्टीसाठी सोलापूरला जावे लागत होते. पण आता ती वेळ अक्कलकोटकरांवर येणार नाही,असे ते म्हणाले.यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे,यशवंत धोंगडे, माजी जि.प.सदस्य आनंद तानवडे,माजी जि.प.कृषी समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील,वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचे प्रथमेश इंगळे, जेष्ठ नेते अशपाक बळोरगी,चन्नवीर चिट्टे,विलास कोरे,निनाद शहा,दिनेश पटेल,राजशेखर हिप्परगी,डॉ.संतोष मेहता,नागराज कुंभार, राजू कोकळगी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. येणेगुरे यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत अशोक येणेगुरे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!