ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वर्धापनदिनी धर्मसंकिर्तन व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन !

अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सालाबादप्रमाणे यंदाही ३७ वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, या उत्सवाच्या सस्नेह निमंत्रण पत्रिका पूजन गुरुवारचे औचित्य साधून करण्यात आले. धर्मसंकिर्तन व संस्कृतीक कार्यक्रम २०२४ यंदाचे २५वे रौप्य महोत्सव वर्ष आहे.
दरम्यान पत्रिकेचे विधिवत पूजन अमोलराजे भोसले यांच्या हस्ते व उद्योगपती दत्ताआण्णा सुरवसे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे,वास्तूविशारद योगेश अहंकारी, अभियंता किरण पाटील, अमित थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सौरभ मोरे, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, निखील पाटील, पिंटू दोडमनी, प्रवीण घाडगे, गोटू माने, दत्ता माने, बलभीम पवार, बाळासाहेब पोळ, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विठ्ठल रेड्डी, विश्वनाथ कलशेट्टी, सुमित कल्याणी, खंडेराय होटकर, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!