---Advertisement---

अन्यथा पवारांनी आ.आव्हाडांना थांबवले असते : आ.शिरसाठ !

By team
On: January 4, 2024 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून शरद पवार गटाचे आमदार व सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी सुरु आहे. त्यातच शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी थेट प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने आता हा वाद रंगू लागला आहे. यावर आता शिंदे गटाचे आ.संजय शिरसाठ यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी जो काल मुर्खपणा केला आहे तो शरद पवार यांच्यासमोर केला आहे. शरद पवार यांनीच त्या वक्तव्याला मुकसंमती दिली आहे. नाहीतर त्यांनी आव्हाडांना थांबवले असते, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी रामांबद्दलच्या वक्तव्यांवरुन जितेंद्र आव्हाड यांच्यासह पवार आणि उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आ.शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की, काही लोकांची मते मिळविण्यासाठी हिंदु धर्माचा कितीही अपमान केला तर चालतो ही मग्रुरी, ही मस्ती आव्हाडांमध्ये दिसून आली आहे. काही लोकांची मते मिळविण्यासाठी हिंदु धर्माचा कितीही अपमान केला तर चालतो ही मग्रुरी, ही मस्ती आव्हाडांमध्ये दिसून आली आहे. त्याला उद्धव ठाकरे जे आव्हांडांना मांडीवर घेऊन बसतात त्यांनी याबद्दल एक शब्द न काढणे हे दुर्देव आहे. यापुढे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा टेंभा मिरवू नये. उद्या कोणी रामांचा अपमान करो की कोणत्या हिंदु देवताचा अपमान करो आमची आघाडी झाली पाहिजे, ही जी लाचारी उद्धव ठाकरे गटाने स्वीकारली आहे. त्यामुळे जनता त्यांना लोकसभा आणि विधानसभेत त्यांची जागा दाखवेल.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!