---Advertisement---

थकवा, अशक्तपणावर मात करा; रक्तवाढीसाठी दोनच घटक पुरेसे !

By team
On: December 15, 2025 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) जाणवते. शरीरात रक्त कमी झाल्यास थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, कामात लक्ष न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात. काही वेळा परिस्थिती गंभीर झाल्यास डॉक्टरांना रक्त चढवावे लागते. मात्र, योग्य आहार घेतल्यास ही समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर करता येऊ शकते.

तज्ज्ञांच्या मते, रक्तवाढीसाठी बीट आणि पालक हे दोन अत्यंत उपयुक्त पदार्थ आहेत. बीटमध्ये आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे बीटचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीरातील रक्ताची पातळी सुधारण्यास मदत होते.

बीट विविध प्रकारे खाता येते. सॅलड, उसळ, भाजी किंवा ज्यूसच्या स्वरूपात बीटचा आहारात समावेश करता येतो. विशेषतः सकाळी उपाशीपोटी बीटाचा ज्यूस घेतल्यास त्याचा अधिक लाभ होतो, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

त्याचप्रमाणे पालकही रक्तवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पालकमध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. दररोज पालकाचे सेवन केल्यास रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत होते आणि शरीराची ताकद वाढते.

निरोगी आरोग्यासाठी सकाळी उपाशीपोटी बीट आणि पालकाचा ज्यूस घेणे फायदेशीर ठरू शकते. नियमित व संतुलित आहारासोबत या दोन घटकांचा समावेश केल्यास रक्ताची कमी दूर होऊन शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!