---Advertisement---

सोलापुरात खळबळ : पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघं तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

By team
On: May 3, 2025 9:38 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमानी अप्रेल्सच्या कारखान्यातील पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघा सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर नारायण कांबळे (वय 23, रा. स्वागत नगर) व सिद्धाराम यशवंत चलगेरी (28, रा. जुळे सोलापूर) अशी दोघा मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सफाई कर्मचार्‍यांची स्वतःची टाकी स्वच्छ करून देण्याची वेबसाईट आहे. याद्वारे एमआयडीसी परिसरातील कारखानदाराने त्यांना टाकी स्वच्छ करण्यासाठी शुक्रवारी बोलावले. टाकी स्वच्छ करण्यासाठी चौघे कर्मचारी कारखान्यात आले. यावेळी त्यांनी टाकीमध्ये अ‍ॅसिड टाकले. अ‍ॅॅसिड टाकून चौघे नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले. नाश्ता करून आल्यानंतर यातील एक कर्मचारी टाकीमध्ये उतरला. त्याने टाकी धुण्यासाठी अ‍ॅसिड टाकल्यामुळे हौदात गॅस तयार होऊन त्याच्या नाकातोंडात गेल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला.

बराच वेळ तो वरती न आल्याने दुसरा कर्मचारी खाली उतरला. त्यालाही विषारी वायू सहन न झाल्याने अस्वस्थ वाटू लागले. हे टाकीवर असलेल्या तिसर्‍या कामगाराने पाहिले. त्याने टाकीतील दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही विषारी वायूमुळे अस्वस्थ वाटू लागले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

याप्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!