नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील छोटे मोठे व्यापारी आपल्या उद्योगात अनोखी ऑफर ठेवून चर्चेत येत असतात तर आता नागपूर शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्याने भन्नाट ऑफर ठेवली आहे. पाणीपुरी चाहत्या खवय्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. नागपुरात एका पाणीपुरी विक्रेत्याने पाणीपुरीवर एक भन्नाट ऑफर दिली आहे. या विक्रेत्याने रोज, आठवड्याला, महिना, वार्षिक आणि लाईफटाईम फ्री मध्ये पाणीपुरी खाण्याची ऑफर दिली आहे. मात्र यासाठी तुम्हाला काही रूपये आधी भरावे लागणार आहेत.
पाणीपुरी, गोलगप्पे…तुम्ही याला काहीही म्हणा, मसालेदार पाणी, चिंचेचा कोळ, पुदीण्याचे आंबट गोड पाणी आणि गोल कुरकुरीत टम्म पुऱ्या भारतात इतके प्रसिद्ध आहे की, रस्त्यावरच्या स्टॉल आणि फाईव्ह स्टार हॉटेलपासून ते स्थानिक उत्सवादरम्यान ही पाणीपुरी हमखास मिळते. पाणीपुरीला महिला, पुरूष, ज्येष्ठांसह बच्चे कंपनीपर्यंत सर्वजण चवीने खातात. जर बाजारात पाणीपुरीचे दुकान असेल आणि तिथे गर्दी नाही असे होणारच नाही.
पाणीपुरी चाहत्या खवय्यांसाठी नागपुरात एका पाणीपुरी विक्रेत्याने अनोखी ऑफर आणली आहे. दुकानावर पोस्टर लावल्या आहेत. त्यात म्हंटलंय की, जर कोणी ग्राहकाने एकावेळी १५१ पाणीपुरी खाल्या तर त्याला २१ हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येईल.
या पाणीपुरीवाल्या दुकानदाराने ग्राहकांसाठी विकली, मंथली, वर्ष आणि लाईफटाईम फ्री पाणीपुरी खाण्याची ऑफर दिली आहे. यासाठी एकावेळी एक निर्धारित रक्कम भरावी लागणार. दुकानदाराच्या मते, जर एखाद्या ग्राहकाला आठवडाभर पोटभर पाणीपुरी खायाची असेल तर त्याला ६०० रूपये एकाचवेळी भरावे लागतील. जर एखाद्या ग्राहकाला महिनाभर पाणीपुरी खायाची असेल तर त्याला ५ हजार रूपये द्यावे लागतील. सोबतच ५०० रूपयांपर्यंत दुकानात असलेला कोणताही पदार्थ फ्री मध्ये खाता येणार आहे. सहा महिन्यापर्यंत पाणीपुरी खाल्ली तर सहाव्या महिन्यात ३० हजार रूपये बक्षीसही मिळणार.
या दुकानदाराने आणखी एक विशेष ऑफर दिली आहे. त्या अनुसार, ५ हजार रूपये जमा करून १० हजार रूपयापर्यंतची पाणीपुरी वर्षभर खाता येणार आहे. जर कोणी ग्राहक रोज पाणीपुरी खात असेल तर त्याला ९५ रूपयांमध्ये अनलिमिटेड पाणीपुरी खायाला मिळणार आहे.
पाणीपुरी विक्रेत्याने ९९,००० रूपये भरल्यावर आयुष्यभर पाणीपुरी देण्याची ऑफरही ठेवली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकाने एकदा पैसे भरले की, तो आयुष्यभर स्टॉलवर केंव्हाही येउन पाणीपुरी खाउ शकतो.