---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात उद्या राष्ट्रवादीतर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियान

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात पक्ष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली आहे. हे अभियान तालुक्यात ९ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे.

जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, खजिनदार राजेंद्र हजारे, जिल्हा सरचिटणीस लतिफ तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता सलगर येथून या अभियानाला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमास पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या त्या जिल्हा परिषद गटात ठरवलेल्या नियोजन पत्रिके नुसार उपस्थित राहणार आहेत.

  • सकाळी ११ ते १२ वाजता सलगर जिल्हा परिषद गट ( स्थळ: हनुमान मंदिरा समोर , सलगर)
  • १२ : ३० ते १ : ३० वाजता वागदरी जिल्हा परिषद गट ( परमेश्वर मंदिरासमोर , वागदरी )
  • दुपारी २ ते ३ वाजता चपळगाव जिल्हा परिषद गट ( स्थळ: चपळगाव ग्रामपंचायत कार्यालया समोर)
  • ३ ते ४ वाजता: जेवण व विश्रांती ( पिंटू मंगरूळे नन्हेगांव यांच्या निवासस्थानी)
  • ४ ते ५ वाजता जेऊर जिल्हा परिषद गट ( स्थळ: काशिलिंगेशवर मंदिरासमोर, जेऊर) व कार्यक्रमाची सांगता. 

 

या दौऱ्यात जिल्हा सरचिटणीस प्रा.प्रकाश सुरवसे, व्हीजेएनटी सेलचे मोतीराम चव्हाण, शहर उपाध्यक्ष शिवराज स्वामी, जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी सुनंदा राजेगावकर, महिला तालुकाध्यक्षा माया जाधव, सुरेखा पाटील, शंकर व्हनमाने,सिद्धाराम पोतदार, इस्माईल फुलारी, अर्जुन बनसोडे, बंदेनवाज कोरबु,नसरीन बागवान, शंकर उर्फ बंटी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष राम जाधव आणि तालुका कार्याध्यक्ष माणिक बिराजदार यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!