---Advertisement---

जागो हिंदुस्थानी कार्यक्रमातून अक्कलकोटमध्ये देशभक्तीचा जागर

By team
On: January 28, 2024 3:23 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

स्वतःच्या मुलाच्या लग्नात सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट शहरात ‘जागो हिंदुस्थानी’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून तालुक्यात देशभक्तीचा माहोल निर्माण केला.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या कार्यक्रमाला विशेष म्हणजे पाकिस्तानातून सही सलामत सुटून आलेले सोल्जर चंदू बाबूलाल चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून सैनिकांचा मोठा सन्मान केला.या कार्यक्रमाला अक्कलकोट शहर व तालुक्यातील सर्व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात कोल्हापूरचे प्रा. सुरेश शुक्ल निर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या जागो हिंदुस्थानी कार्यक्रमातून विविध कलाकारांनी विविध देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने कली.इतनी शक्ती हमे देन दाता,ऐ मेरे वतन के लोगो,डाल डाल पर सोने की चिडीया,रंग दे बसंती, चिट्ठी आई है अशा अनेक देशभक्तीपर गीतांकडे सर्वांचे लक्ष वेधले.बस स्टँड जवळील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागे असलेल्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अक्कलकोट संस्थानचे राजे मालोजीराजे भोसले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हजारे,माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोरे,शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख,जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे,तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले,शिवराज स्वामी, बापूराव सुरवसे,विठ्ठल फडतरे,रामचंद्र शिंदे,लतीब ठोकळे,नटूलाल शेख,परशुराम खडसे,किसन सुर्यवंशी,माया जाधव,मीरा बुद्रुक आदींची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविराज सिद्धे, विशाल राठोर, प्रा.शाहबोद्दीन शेख, डिके ग्रुपचे सर्व सदस्य,आपुलकी बहुउद्देशीय सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि दिलीप सिद्धे मित्रपरिवारने परिश्रम घेतले.

मेजर चंदू चव्हाण यांनी सांगितले पाकिस्तानातील किस्से
या कार्यक्रमात चंदू चव्हाण हे ज्यावेळी पाकिस्तानमध्ये ते अडकले होते त्यावेळी पाकिस्तानच्या सेनेने दिलेला त्रास आणि तेथील सर्व हकीकत उपस्थित त्यांना स्टार्ट टू एंड सांगितली. एवढे अक्षरशः उपस्थितितांच्या अंगावर शहारे आले.यातून सैनिकाचे काम किती कठीण असते याची प्रचिती त्यांनी सर्वांना करून दिली.सर्वांनीच त्यांच्या या शौर्याचे कौतुक करत टाळ्यांनी मोठी दाद दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!