अक्कलकोट : प्रतिनिधी
गणेश वंदना, श्री स्वामी समर्थ, दूरच्या रानात केळीच्या बनात, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ सादरकर्ते सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्सपुर्त प्रतिसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी ७ वा. ‘भक्तिरंग’ भक्तिगीते, भावगीते व नृत्य सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांचा ह्या कार्यक्रमाने ९ वे पुष्प संपन्न झाले.
दरम्यान कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कॉंग्रेसच्या युवा नेत्या शीतलताई म्हेत्रे, उद्योजक शैलेश पिसे, न्यासाचे विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, लाला राठोड, फैजअहमद उर्फ नन्नु कोरबू, अक्कलकोट कृषी उत्पन्न बजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडीखांबे, अंकुश चौगुले, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, सुनील खवळे, लखन झंपले, ऋतुराज उर्फ बंटी राठोड, विठ्ठल तेली, पत्रकार विजयकुमार देशपांडे, विठ्ठलराव खेळगी, अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.
गुणीजन गौरव :
दिलीप महिंद्रकर : आरोग्यदूत सुप्रभात परिवार अक्कलकोट, विक्रम खेलबुडे : अध्यक्ष -सोलापूर श्रमिक पत्रकार संघ सोलापूर, राजेंद्र मोरे : शिक्षक-नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर, शिवशरण सुरवसे : तालुका अध्यक्ष –महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट, अरविंद जगदाळे : एसटी.वाहक अक्कलकोट आगर यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
दि. २० जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सुर भक्तीचे उमटले’ भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे.
याप्रसंगी न्यासाचे डॉ.मनोहर मोरे, डॉ.आर.व्ही.पाटील, विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, अनुयाताई फुगे-पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, सुवर्णा घाडगे, छाया पवार, व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संदीप फुगे-पाटील, संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, मनोज निकम, सिद्धेश्वर मोरे, अप्पा हंचाटे, बाळासाहेब मोरे, पिंटू साठे, सनी सोनटक्के, गणेश भोसले, संतोष माने, रमेश हलसंगी, प्रा.शरणप्पा आचलेर, अरविंद शिंदे, ओंकारेश्वर उटगे, अॅड.संतोष खोबरे, राजु नवले, निखील पाटील, पिंटू दोडमनी, प्रवीण घाडगे, गोटू माने, सौरभ मोरे, वैभव मोरे, अशपाक काजी, रोहित खोबरे, राजेश शिर्के, रोहन शिर्के, अविनाश मडीखांबे, सुनील बंडगर, शिवराज स्वामी, अतिश पवार, प्रितेश किलजे, गोविंद शिंदे, स्वामिनाथ गुरव, किरण पाटील, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, श्रीकांत झिपरे, रितेश शिंदे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, ज्ञानेश्वर भोसले, फहीम पिरजादे, महेश कुलकर्णी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, फुलचंद राठोड, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.