ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल : बीड जिल्ह्यात कडकडीत बंद !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीडच्या केज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, बीड जिल्हा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंदसाठी आवाहन केले. तसेच परळी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या सिरसाळा येथेही कडकडीत बंद पाळ‍ण्यात आला. दरम्यान, वाल्मीक कराड याला फाशी देण्यात यावी अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येथे मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते, धनंजय मुंडे यांचे फोटो फाडून ते पायदळी तुडवण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!