---Advertisement---

‘पंतप्रधान मोदींची मन कि बात’ : जनतेला केले आवाहन

By team
On: June 30, 2024 4:25 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच आज मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या संदर्भानं देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. आई आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात मौल्यावान नाते आहे. आपण आपल्या आईसाठी काही देऊ शकत नाही. पण आपण आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे असं आवाहन पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून केलं.

30 जूनचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस ‘हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अद्भूत धैर्याशी संबंधित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शूर सिद्धो-कान्हू यांनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करुन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. 1855 मध्ये हे घडले होते. म्हणजे 1857 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी. तेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रे उचलली होती असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात रेडिओ कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. आज मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशातील लोकशाही प्रणालींवर आपला अतूट विश्वास व्यक्त केला आहे. 2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झालेली नाही. या निवडणुकीत देशातील 65 कोटी लोकांनी मतदान केले आहे. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो असंृेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!