---Advertisement---

अक्कलकोट येथे अन्याया विरोधात आक्रोश मोर्चा

By team
On: February 6, 2024 9:45 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

कर्नाटकात गुलबर्गा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना आणि अक्कलकोट शहर तालुक्यात दलितावर होणाऱ्या अन्याया विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

भीम नगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून एवन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा समारोप एवन चौकात सभेने करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गगनभेदी जयघोष करीत हलग्यांच्या कडकडाटात हा मोर्चा निघाला होता. मागण्यांचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती होते. जाहीर सभेत तालुका आरपीआयचे अध्यक्ष अविनाश मडिखांबे, उत्तम गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, अजय मुकणार, सुहानी मडिखांबे, विक्की चौधरी, संदीप मडिखांबे, सागर सोनकांबळे, विठ्ठल आरेनवरू यांनी मनोगत व्यक्त केले.

या मोर्चामध्ये माजी सभापती चंद्रकांत इंगळे, सिद्धार्थ गायकवाड, विजय मुकणार, किशोर खरात, सचिन बनसोडे, तुकाराम दुपारगुडे, राहुल रुही, बाबुराव बनसोडे, यशवंत नडगम आदी सहभागी झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्यांना फाशी देण्यात यावी, अक्कलकोट शहर आणि तालुक्यात दलित समाजावर अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसीलदार विकास पवार यांना निवेदन देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!