---Advertisement---

बसस्थानकातील दक्षिण पायवाट प्रकरणावरून जनआक्रोश

By team
On: June 17, 2025 3:26 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहरातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य बस स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पाठीमागील पायवाटीचा मुद्दा चांगलाच पेटला असून या पार्श्वभूमीवर हिंदू जनआक्रोश मोर्चा १९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता बस स्थानक परिसरात या मोर्चाच्या अनुषंगाने सभा पार पडणार असून यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार देवेंद्र कोठे व आमदार सचिन कल्याणशेट्टी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून २९ कोटी रुपये निधीच्या सहाय्याने अत्याधुनिक, सुविधासंपन्न बस स्थानक उभारले जात आहे. परंतु, या बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या दक्षिण दिशेला काही लोकांकडून पायवाट सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. संबंधित मार्गाचे दोन्ही बाजूंनी पर्यायी रस्ते उपलब्ध असताना केवळ हट्टापोटी अशा पायवाटीची मागणी होत असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

या मागणीमुळे भविष्यात अतिक्रमण, घुसखोरी, महिला सुरक्षेचा प्रश्न आणि बस स्थानक परिसरात गैरप्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्याने उभारण्यात येणाऱ्या बस स्थानकाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत बस स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी ही मागणी पूर्णपणे अयोग्य असून, ती मागे घ्यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात अक्कलकोट शहरासह परिसरातील विविध गावांतील हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, मोर्चात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!