---Advertisement---

पुरी : जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू

By team
On: August 14, 2025 4:11 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भिंतीवर आढळलेल्या पोस्टरवर ‘दहशतवादी श्रीमंदिर पाडतील. मला फोन करा, अन्यथा विनाश होईल’ अशी धमकी लिहिलेली होती.

पुरीच्या एका रहिवाशाने सांगितले की मंदिराच्या भिंतीवर अनेक फोन नंबर लिहिलेले आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी, दिल्ली असे शब्दही लिहिलेले आहेत. घटनास्थळी भेट देणारे पुरीचे एसपी पिनाक मिश्रा म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि ते खूप गांभीर्याने घेत आहोत. आम्हाला काही माहिती मिळाली आहे आणि अशा धमक्या देणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके तयार केली जात आहेत.

पोलीस परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे. ही धमकी मंगळवारी रात्री लिहिली गेली होती. ते म्हणाले की, पोलीस या धमकीमागील हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. दरम्‍यान, या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, जो ‘मानसिकदृष्ट्या अस्थिर’ असल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!