---Advertisement---

मराठा सेवा संघ पंचायत समिती शाखा अध्यक्षपदी राहुल शिंदे

By team
On: March 27, 2025 1:10 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखा अंतर्गत पंचायत समिती शाखा अध्यक्ष म्हणून अक्कलकोट पंचायत समिती शाखा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान ही निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. मराठा सेवा संघ अक्कलकोट अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी दक्षिण सोलापुर येथील कर्मचारी संघटनेचे पांडुरंग खारे, अश्विनी खारे यांनी त्यांच्या तर्फे सत्कार केला.यावेळी विस्तार अधिकारी पी. एल. कोळी, ए. एस. अंजुटगी, दयानंद परिचारक, निलाफ दामटे, रोहिणी खारे आदी उपस्थित होते. या निवडीमुळे मराठा सेवा संघात आनंदाचे वातावरण आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!