अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त नागणसुर,तडवळ,दुधनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी तेथील शाखा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुले – मुली शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते नागणसुर शाखेच्यावतीने शैक्षणिक साहित्य,वह्या आणि केळी ,चॉकलेट खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बसलिंगय्या स्थावरमठ होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बसवराज मंटगी,प्रसाद प्रचंडे उपस्थित होते .व्यासपीठावर अंबादास गायकवाड,अप्पा भालेराव,प्रकाश गडगडे मुख्याध्यापक विद्याधर गुरव, श्रीशैल दोडमनी ,लक्ष्मीकांत नागोजी,महादेव चिक्कळी, हुच्चप्पा अलमेल आदी उपस्थित होते .प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे बोलताना म्हणाले, राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करून यावेळी वाढ दिवस साजरा केल्याने नक्कीच गरीब विद्यार्थांना आधार मिळणार आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्तीथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीची हात दिल्याने नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास उंचावेल.या निस्वार्थ भावनेने हा उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.यावेळी प्रसाद प्रचंडे आणि बसवराज मंटगी यांनी ही उपक्रमाचे कौतुक करून शालेय विकासासाठी नेहमी प्रयत्नशिल राहण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्याधर गुरव, श्रीशैल दोडमनी ,बसय्या स्वामी, शरणप्पा फुलारी,राजशेखर कूर्ले,लक्ष्मीकांत तळवार,खाजप्पा किणगी, शांता तोळणूरे, चन्नम्मा बिराजदार,राजशेखर खानापुरे,शिवशरण म्हेत्रे विजयश्री एंटमन आदींनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्याधर गुरव यांनी केले तर आभार शरणप्पा फुलारी यांनी मानले .