---Advertisement---

रासपचा अक्कलकोट येथे गुरुवारी बुथप्रमुखांचा मेळावा

By team
On: July 30, 2024 3:14 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांचा मेळावा गुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिली.

या बुथ प्रमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य महासचिव ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजितकुमार पाटील, सोलापूर विभाग जिल्हा अध्यक्ष अशोक ढोणे, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष दामाजी मेटकरी आदी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात बुथप्रमुखांचा आढावा घेण्यात येणार असून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष पुर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याने या बुथप्रमुख मेळाव्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अक्कलकोट तालुक्यात सध्या सर्वच पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची बुथ बांधणी तसेच कार्यकर्ता मेळावा घेतले जात असून रासपच्यावतीने अक्कलकोट विधानसभा निरीक्षक म्हणून अजितकुमार पाटील यांची नियुक्ती केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी अक्कलकोट शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करुन आढावा घेतला होता. त्याअनुषंगाने उद्याच्या बुथ प्रमुखाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन
करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!