---Advertisement---

विनाकारण फिरण्यापेक्षा मतदारसंघात तळ ठोकून कामे करा ; मुख्यमंत्री शिंदे

By team
On: July 20, 2024 5:01 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अशा सूचना करतानाच जागावाटपात मतदारसंघांची अदलाबदल झाल्यास तशाही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकण्याची तयारी ठेवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना इलेक्शन मोडवर आणले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार, मंत्री आणि पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतानाच काही सूचनाही केल्या. ही बैठक जवळपास चार तास चालली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून बसण्याच्या सूचना केल्या. ज्यांचे मुंबई, मंत्रालयात फारसे काम नाही त्यांनी विनाकारण मतदारसंघ सोडून फिरण्यापेक्षा मतदारसंघातच ठाण मांडून बसले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यालाच आपण उमेदवारी देणार असल्याने मतदारसंघात जेवढी ताकद वाढवता येईल तेवढी वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणूक महायुतीमध्येच लढवायची नसल्याने महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी वक्तव्य भाषणांमध्ये वा प्रसारमाध्यमांपुढे करण्याचे टाळा असा सल्लाही त्यांनी दिला. महायुतीतर्फे शिवसेना 110 जागा लढविण्याच्या तयारीत असून त्यानुसार त्यांनी 110 विधानसभा निरीक्षकही नेमण्याबाबत या बैठकीत सूचना दिल्याचे समजते. शिवसेनेला विधानसभेत जास्तीतजास्त जागा मिळाव्यात यासाठीच शिंदे यांची ही रणनिती असल्याचे समजते. यासाठी ते भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे आग्रह करणार असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!