अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सखी ग्रुप नेहमीच समाजाच्या उपेक्षित वंचित घटकातील निराधार, होतकरू, गरीब लोकांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो. महिला दिना प्रित्यर्थ सखी ग्रुपने अक्कलकोट परिसरातील बॅगेहल्ली रोडवरती भटके,फिरस्ती, तसेच डवरी समाजातील लोकांची पाले, झोपड्या लागलेल्या आहेत. या वस्तीतील महिला व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली . डॉ. दीपमाला आडवीतोटे व डॉ. मंजुषा मेंथे या दोन डॉक्टरांनी या सर्व महिला व मुलींची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला.
सखी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी महिलादिनाच्या दिवशी या परिसरात स्वच्छता केली. तसेच मल्लम्मा पसारे यांनी या महिला व मुलींना स्वच्छता,आहार विहार व सखी ग्रुपच्या कार्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.या रुग्ण तपासणी मध्ये बऱ्याच महिलांचे शरीरामध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम,आयर्न जीवनसतवे कमी असलेले आढळून आलेले आहे. त्याबाबतच्या आहाराबाबत मार्गदर्शन करून त्यांना संबंधित औषधे देण्यात आलेली आहेत. यानंतर या सर्वांना व्यवस्थित बसून फळे व मिठाईचे वितरण सखी ग्रुपच्या वतीने करण्यात आले. महिलादिनाची आठवण किंवा भेट म्हणून सखी ग्रुप तर्फे या ७२ महिलांना उत्तम प्रतीचे टॉवेल्स प्रेमाची भेट म्हणून देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास सखी ग्रुपच्या सोनल जाजू,सुवर्णा साखरे, लक्ष्मी अचलेर, माधवी धर्मसाले,रोहिणी फुलारी आशा भगरे,उषा छत्रे अश्विनी बोराळकर, श्रद्धा मंगरुळे, वेदिका हर्डीकर, रत्नमाला मचाले,अनिता पाटील, प्रियंका किरनळी, शितल जीरोळे, रेखा तोरस्कर आदी महिला उपस्थित होत्या….