---Advertisement---

“मुलीचा बाप म्हणून..” दानवेंची लेक भर सभेत ढसाढसा रडली

By team
On: November 18, 2024 7:46 PM
Follow Us:
---Advertisement---

कन्नड वृत्तसंस्था 

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून त्या निवडणूक लढत आहेत. त्या भरसभेत भावुक झाल्यात.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता, मात्र मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात अनेक वादविवाद होऊन अनेक अडचणी आल्या. हर्षवर्धन जाधव यांनी याबद्दल फेसबूक लाईव्हमधून अनेकदा बोलून दाखवलं. मात्र संजना जाधव पहिल्यांदाच याबद्दल बोलल्या आहेत. मुलीचा बाप आहे म्हणून माझा बाप शांत बसला… असं म्हणत संजना जाधव या ढसाढसा रडल्या. मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या.

“माझ्यावर अनेक संकट आलेत, पण मी बोलून नाही दाखवलं, कारण माझ्या मायबापांनी ते मला शिकवलं नाही. लग्नानंतर मी एका महिन्यात काही सांगायला गेले तर तेव्हा वडील म्हणाले एक मूल होऊदे, हा माणूस सुधरेल. नंतर म्हणाले चाळीशी होऊ दे तो माणूस सुधरेल, त्यानंतर मी जे सहन केलं, त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही, पण माझ्या जागेवर कोण आणलं हे तुम्ही पाहिलं. माझी जागा घेण्याचा प्रयत्नही झाला, पण तुमच्या हृदयात असलेली माझी जागा कायम राहिली. त्यांना माझी जागा घेता आली नाही, मुलीचा बाप होता म्हणून तो शांत बसला असं म्हणत संजना दानवे यांनी हुंदका आवरत आवरत सगळं सांगितलं.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या वडिलांवर आरोप झाले, आम्ही सहन केले. एखाद्या मुलाचा बाप असता तर तो रस्त्यावर उतरला असता, पण माझा बाप एका मुलीचा बाप आहे म्हणून तो शांत बसला…प्रत्येक आई-वडील आपल्यावर एकच संस्कार करतात, माझ्या आईने मला सांगितलं होतं की, आज तु माझ्या घरातून जातेय, जेव्हा तू येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे. आतापर्यंत मी कधी रडली नाही, पण आज मला भरून आलं, कारण हे गाव माझं आहे आणि इथल्या लोकांना माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं. मी काय आहे हे जनतेला माहिती आहे. तुम्ही मला संघर्षकन्या नाव दिलं. पण आता संघर्ष करण्याची ताकद संपली. मला यातून तुम्हीच बाहेर काढू शकता” असं आवाहन उपस्थितांना केलं.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!