---Advertisement---

संजय राऊतांनी केले मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक !

By team
On: September 3, 2025 4:37 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईत मनोज जरांगे-पाटील आल्‍यानंतर भाजप नेत्‍यांची भाषा बदलली. त्‍यांनी त्‍यांच्‍याविषयी अत्‍यंत हीन भाषा वापरली. मराठा समाजाविषयी द्वेष पसरवण्‍याचे काम भाजपचे नेते करत होते. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांच्‍या संयमाचे कौतूक करतो. ते पडद्यामागे राहून सूत्र हलवत होते. कालच्‍या शिष्‍टाईचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मी त्‍यांचा टीकाकार असलो तरी कालच आंदोलनात तोडगा काढण्‍यात त्‍यांचे योगदान मोठे होते. जरांगे पाटील यांनी फडणवीस यांचे आभार मानले, ही चांगली गोष्ट आहे. सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो,” अशा शब्‍दांमध्‍ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्‍यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे माध्‍यमांशी बोलताना कौतुक केले.

भाजपचे नेते अजूनही जरांगे यांची कुचेष्टाच करतात. भाजपचे पडद्यामागचे म्हणणे वेगळे आहे. भाजप दुतोंडी गांडुळासारखा आहे. जरांगे पाटील यांच्याबाबतीत भाजप नेत्यांची भाषा हीन दर्जाची होती. ती भाषा एकदा पंतप्रधान मोदींनी ऐकावी. जरांगे आणि मराठा आंदोलकांबाबत त्यांचे नेते कोणती भाषा वापरत होते, तेही ऐकावं त्यांनी. जरांगे पाटील इथं आल्यावर जे टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला. घाणेरडी भाषा वापरली, फक्त फडणवीस यांनी ही भाषा वापरली नाही त्यांच्या संयमाचे कौतुक करतो. आंदोलन सुरु असताना देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागे राहून सूत्र हलवत होते. कालच्‍या शिष्‍टाईचे श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचे आहे. मी त्‍यांचा टीकाकार असलो तरी कालच आंदोलनात तोडगा काढण्‍यात फडणवीस यांचे योगदान मोठे होते. त्याचवेळी भाजपमध्ये बाहेर आलेले नेते यांनी ज्याप्रकारे जरांगेविषयी भाषा वापरली ती समर्थनीय नाही. नंतर लगेच त्याचे श्रेय घ्यायला येतायत. नक्की तुम्ही कोण व भूमिका काय ?, असा सवालही राऊत यांनी केला.

माध्‍यमांशी बोलताना संजय राऊत म्‍हणाले की, एकनाथ शिंदे जरांगेच्‍या मागील आंदोलनातावेळी नवी मुंबईत गुलाल उधळण्‍यास पुढे होते. आता ते कोठे होते. कालच्‍या आंदोलनात दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री कोठे होते? उच्‍च न्‍यायालयात सुनावणी सुरु असताना दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री मुंबईतच उपस्‍थित असायला हवे होते. त्‍यांना मुंबईतील परिस्‍थिती चघळवून फडणवीस यांचे मुख्‍यमंत्री पद धोक्‍यात आणायचे होते, असा सवालही त्‍यांनी केला. जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मुंबईत मोठे आंदोलन झाले. काल सरकारने मागण्या मान्य केल्या, जर जरांगे व आंदोलक समाधानी आहेत तर आम्हीही समाधानी आहोत. नवी मुंबईतही त्यांनी गुलाल उधळला होता. आता मुंबईतील गुलालात व नवी मुंबईच्या गुलालात काय फरक आहे ते बघावं लागेल, असेही राऊत यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळांचे मत बरोबर आहे;पण जोपर्यंत काही समोर येत नाही तोवर आकांडतांडव करू नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार मराठी माणसाची एकजूट कायम राहिली पाहिजे. मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठी बांधव मुंबईत आले. मुंबई तुमचीच आहे हे सांगितले. त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात शिवसैनिक व मनसैनिकांनी चांगले काम केल्‍याचे राऊत म्‍हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!