---Advertisement---

संतोष देशमुख प्रकरणी एका अधिकाऱ्यासह दोघांना SIT मधून हटवलं

By team
On: January 6, 2025 6:30 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड वृत्तसंस्था 

 

राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे त्यांना भोवले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. 31 डिसेंबरला तो सुद्धा पुण्यातच सीआयडीला शरण आला होता.

राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथक म्हणजे SIT मधील एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो समोर आल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. तपास निष्पक्षपणे होणार नाही, असा आक्षेप विरोधी पक्षाने घेतला. त्यामुळे एपीआय महेश विघ्ने, हवलादार मनोज वाघ आणि एका उपनिरीक्षकाला SIT मधून हटवण्यात आलं आहे. बीडची स्थानिक गुन्हे शाखा या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत त्यांनीच पाच आरोपींना अटक केली आहे. अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पकडू असा स्थानिक गुन्हे शाखेचा दावा आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!