---Advertisement---

“सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता” ; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

By team
On: March 27, 2025 1:39 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारवर ठाकरे गट हल्लाबोल करण्यासाठी एक हि संधी सोडत नसताना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. कुणाल कामराने सरकारवर योग्य गाणं केलं आहे. देशातील मोदींची सत्ता ही “सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता” आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारची स्थिती ही ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’, अशी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केली आहे. ते आज (दि.7) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, शिवरायांचा अपमान करणारा सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळा संचालक आपटेवर अद्याप कारवाई नाही? मात्र कॉमेडियन कुणाल कामराने गद्दारावर टीका केली की लगेच कारवाई. मग महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी? असा सवाल त्यांनी केला.

राज्यपालांच्या भाषणात नेहमी माझं सरकार असा उल्लेख असतो. भाजपने हिंदुत्त्व कधीच सोडलं आहे. आता ‘सौगात ए सत्ता’ हेच भाजपचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपचा बहुसंख्यांक सेल सणानिमित्त काही मागणार नाही का? , असा सवालदेखील ठाकरे यांनी केला.

सरकारकडून केवळ योजनांच्या घोषणा, लाडक्या बहिणींना २१०० रूपये, मात्र आता बहिणींमध्ये वर्गवारी केली जाते. सरकार यावर काही बोलत नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि आता शेतकऱ्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जातंय. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी सरकार सगळ्यांच्या गठाभेटी घेत जाणार, अशी शक्यतादेखील ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सरकारने नीट उत्तरे दिली असती तर मला बोलण्याची वेळ आली नसती. ज्या समाजात विष पेरलं त्याच समाजात सरकार अन्न धान्य वाटत आहे. हे लोक दडपशाही हे करत आहेत. मी त्यांना शिवसेना मनात नाही. शिवसेना एकच आहे, शिंदेंची शिवसेना ही गद्दारांची आहे. त्यांच्याकडे बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेवर केली.

वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून भांडण्यापेक्षा ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारकाचे जल पूजन झाले त्याच काय झाले?… हे लोक स्मारकावर पाणी सोडणार आहेत का?, ह्या लोकांना स्मारकचे स्मरण करून द्यावे लागते. शिवरायांच्या स्मारकाबाबक सरकारला काही देणे घेणं नाही. वाघ्या कुत्र्याबाबत इतिहास अभ्यासकांचे मत जाणून घेतले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!