---Advertisement---

भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला व सिव्हिल हॉस्पिटला दिली भेट.

Follow Us:
---Advertisement---

सोलापुर : भाजपचे जेष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला व सिव्हिल हॉस्पिटला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयात काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोग्य सुविधांबाबत तक्रारीही केल्या.

शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्या बाबतच्या तक्रारींची दखल घेऊन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉ. माणिक गुर्रम व डॉक्टर विजयकुमार अरकाल यांच्याशी उपाय योजनांबाबत चर्चा केली.

रुग्णालयातील सीटी स्कॅन व एमआरआय मशीन, ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम ,महापालिका उपायुक्त धनराज पांडे, भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपा नगरसेवक नागेश वल्याळ, अविनाश बोमडयाल, पुणे संचालक तिरुपती विडप,सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद, प्रशांत पल्ली, अरुण गोगी, सरिता वडनाल ,आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!