---Advertisement---

खळबळजनक : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी तर अनेकजण जखमी

By team
On: January 29, 2025 9:21 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. तथापि, संगम नदीच्या काठावर अजूनही लोकांची प्रचंड गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगम किनाऱ्यावर कसे तरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन करत आहेत.

पंतप्रधान मोदी कुंभमेळ्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि राज्य सरकारशी सतत संपर्कात आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलले आहे आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी आणि मदतीसाठी निर्देश देत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!