---Advertisement---

खळबळजनक : एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला केले निर्वस्र

By team
On: August 31, 2024 10:20 AM
Follow Us:
---Advertisement---

छ. संभाजीनगर : वृत्तसंस्था

देशासह राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एक्स-रे काढण्यासाठी तरुणाला निर्वस्र करून अंगालाही स्पर्श केला. घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला टेक्निशियनने टॉप काढायला लावत निर्वस्त्र करून तिच्या अंगाला स्पर्श केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे एक्स-रे घेणारा व्यक्ती रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसल्याचही समोर आले आहे. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर तो घाटीमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता. मात्र कंत्राट संपल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले होते. परंतु तरीही विभागात त्याचे येणे जाणे सुरू होते. याप्रकरणी आरोपी शेख मोहम्मद फरहान शेख नईमुद्दीन यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

छातीमध्ये त्रास होऊ लागल्याने एका तरुणाला एक्स-रे काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. ही तरुणी एक्स-रे काढण्यासाठी घाटी रुग्णालयात आली होती. त्यावेळी कामावरून काढून टाकलेल्या टेक्निशियनने एक्स रे रूममध्ये अनाधिकृत प्रवेश केला आणि चक्क तिला टॉप काढायला लावून तिला निर्वस्त्र होण्यास प्रवृत्त करून तिच्या अंगाला अश्लील स्पर्श केला.तीन दिवसानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी घाटी प्रशासनाला जाब विचारत चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी वर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. घाटी रुग्णालयात घडलेल्या सगळ्या प्रकरणी अधिष्ठातांनी चौकशी समिती नेमलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!